भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्यांचिया चरणा माझे दंडवत । ज्यांचे धनवित्त पांडुरंग

tyanchiya charana majhe dandavat | jyanche dhanavitta pandurang

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
त्यांचिया चरणा माझे दंडवत । ज्यांचे धनवित्त पांडुरंग ॥१॥ तेथे माझा जीव पावला विसांवा । म्हणऊनि हांवा भरलोसे ॥ध्रु.॥ चरणींचे रज लावीन कपाळा । जी पदे राउळा सोई जाती ॥२॥ आणिक ती भाग्ये येथे कुरवंडी । करुनियां सांडी इंद्राऐसी ॥३॥ वैष्णवांचे घरी देवाचे वसति । विश्वास हाचित्ती सर्वभावे ॥४॥ तुका म्हणे सखे हरीचे जे दास । आतां पुढे आस दुजी नाही ॥५॥