भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्रिगुणात्मक देह पंचभुतीं खेळ । शेवटीं निर्फळ होईल रया

trigunatmak deh panchabhutin khel | shevatin nirphal hoil raya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्रिगुणात्मक देह पंचभुतीं खेळ । शेवटीं निर्फळ होईल रया ॥१॥ दिसती भूताकृति वाउगी ते मिथ्या । शेवटीं तत्त्वतां कांहीं नुरे ॥२॥ पंचभुतें विरती ठायींचे ठायीं । वाया देहादेहीं बद्धमुक्त ॥३॥ एका जनार्दनीं नाथीलाची खेळ । अवघा मायाजाळ जाईल लया ॥४॥