भजनी मालिका
← भजनांकडे परत

त्यागुनी कर्म जाहला संन्यासी । ज्ञान ध्यान नाहीं मानसीं

tyaguni karma jahala sannyasi | dnyan dhyan nahin manasin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
त्यागुनी कर्म जाहला संन्यासी । ज्ञान ध्यान नाहीं मानसीं ॥१॥ शिखा सूत्र त्यागून जाण । करी दंडासी ग्रहण ॥२॥ नित्य भिक्षा पुत्राघरीं । मठ बांधोनी राहे द्वारीं ॥३॥ एका जनार्दनीं संन्यास । वायांची नाश कायेचा ॥४॥