भजनी मालिका
← भजनांकडे परत

तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार

tonden khaye phar | pade bocha kari mar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार ॥१॥ एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणें ॥ध्रु.॥ कुले घालूनि उघडे। रागें पाहे लोकांकडे ॥२॥ खेळे जुतकर्म । मग बोंबली जुलूम ॥३॥ निजतां आला मोहो । वीतां म्हणे मेला गोहो ॥४॥ तुका म्हणे त्यांनीं। मनुष्यपणा केली हानी ॥५॥