भजनी मालिका

भजने

जीवें भावें जोडिलें होतें । पूर्व फळा तें आजी आलें ॥१॥ अंगीकार तुम्ही केला । मुखींचा दिधला प्रसाद ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जीहीं जाणितलें वर्मासी । त्याचें दास्य करिसी । गर्भवास सोसिशी । त्याचें साठी ॥१॥ घर कुंटुंब ना आभावो । गांव न तुज ठावो । सोलाट तुं पाहा हो । लागला जगीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जुंझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां देह दुःख थोर आहे ॥१॥ तैसी हरीभक्ति सुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जे केली आळी ते अवघी गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥ काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पाळियेलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायीं चित्त ठेवीन मी ॥१॥ जयांसी आवडे विठ्ठलाचें नाम । ते माझे परम प्राणसखे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जें जें करिती तें तें वृथा । पंढरिनाथा न भजतां ॥१॥ दिसे पुढें परी तें माया । जाइल विलया क्षणमात्रें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जें जें कर्म करावें या देहीं । भोगावें तेंही देहादेह ॥१॥ देहींचें कर्म देहींच भोगावें । वायां कां शिणावें हाव भरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जें जें कांही करितों देवा । तें तें सेवा समर्पें ॥१॥ भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम