भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें जें कांहीं होय जाय । त्या त्या लय अव्दैतीं

jen jen kanhin hoy jay | tya tya lay avdaitin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जें जें कांहीं होय जाय । त्या त्या लय अव्दैतीं ॥१॥ तें अव्दैतही लोपल्या पाठीं । आपणाचि पोटीं आपण ॥२॥ तया नांव स्वरुप म्हणती । जें निज एकांतीं एकलें ॥३॥ निळा म्हणे दावूनियां नामरुपा । नयेचि पडपा विश्वाकृती ॥४॥