भजनी मालिका
← भजनांकडे परत

जे आसक्त संसारीं । ते अघोरीं पडती

je asakta sansarin | te aghorin padati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जे आसक्त संसारीं । ते अघोरीं पडती ॥१॥ तयां नाहीं सोडविता । सदगुरुनाथावांचुनी ॥२॥ त्याचे चरण धरा चित्तीं । मग भीति कासया ॥३॥ एका जनार्दनीं शरण । जन्ममरण चुकलें ॥४॥