भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवेंभावें जाहलों दास । नाहीं आस संसारा

jivembhaven jahalon das | nahin as sansara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जीवेंभावें जाहलों दास । नाहीं आस संसारा ॥१॥ नाशिवंता पाठीं धांवे । कोन हावे भोगील ॥२॥ जन्मजरामरण फेरा । या संसारा आंचवलों ॥३॥ जाहला संतसमागम । भवभ्रम फिटला ॥४॥ एका जनार्दनीं काम । मन जाहलें तें निष्काम ॥५॥