भजनी मालिका

भजने

जिकडे पाहे तिकडे बांधलोंसे हरी । सुटायाचा करी बहु यत्न ॥१॥ परी तें वर्म मज न कळे कांहीं । अधिंकचि डोहीं बुडतसे ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

जिणे मरणें नाहीं आतां । हरीच्या भक्तां कल्पांती ॥१॥ त्याच्या ध्यानें तैसेंचि आलें । आपुला विसरले देहभाव ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जिता मायबापा न घालिती अन्न । मेल्या प्रेतावरी करिती पिंडदान ॥१॥ पहा पहा संसारींचा कैसा आचारु । जिता अबोला मा मेल्या उच्चारु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जिवलग कोण तुजविण होईल । जें माझें जाणेल जडभारी ॥१॥ अन्यायी अपराधी तुम्हां शरणागत । तुजविण हित कोण करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जिवाचाही जीव माझया शिवाचा शिव । पंढरीचा देव मन बुध्दी इंद्रियें ॥१॥ आईका हो श्रोते तुम्ही संत सज्जन । मी माझें हें जतन कोण करी यावरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

जिव्हा जाणे फिकें मधुर क्षार । येर मास पर हातास न वळे ॥१॥ देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

जिव्हा रस चाखी अवलोकी नेत्र । प्रेरक पवित्र आत्माराम ॥१॥ बोलतसे मुख त्वचे कळे स्पर्श । प्रेरक परेश आत्माराम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

जिव्हा लागली नामस्मरणीं । रित्या मापें भरी गोणी ॥१॥ नित्य नेमाची लाखोली । गुण आज्ञेनें मी पाळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जिव्हा लागली नामस्मरणीं । रित्या मापें भरी गोणी ॥१॥ नित्य नेमाची लाखोली । गुण आज्ञेनें मी पाळीं ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

जिव्हे केशवाचें करितां कीर्तन । मिथ्या वदूं नको एक रामाविण ॥१॥ म्हणऊनि हरिरंगीं रंगा । नाम घेतां महा पातकें जाती भंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव