भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें जें कर्म करावें या देहीं । भोगावें तेंही देहादेह

jen jen karma karaven ya dehin | bhogaven tenhi dehadeh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जें जें कर्म करावें या देहीं । भोगावें तेंही देहादेह ॥१॥ देहींचें कर्म देहींच भोगावें । वायां कां शिणावें हाव भरी ॥२॥ आपुलें संचित तैसा कर्मभोग । वाउगा उद्योग बोलून काय ॥३॥ एका जनार्दनीं कर्माची जे रेखा । न चुके सकळिकां भोग त्याचा ॥४॥