भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिवलग कोण तुजविण होईल । जें माझें जाणेल जडभारी

jivalag kon tujavin hoil | jen majhen janel jadabhari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जिवलग कोण तुजविण होईल । जें माझें जाणेल जडभारी ॥१॥ अन्यायी अपराधी तुम्हां शरणागत । तुजविण हित कोण करी ॥२॥ नामा म्हणे आई धावें लवलाहीं । बुडतों या डोहीं दंभाचिया ॥३॥