भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिकडे पाहे तिकडे बांधलोंसे हरी । सुटायाचा करी बहु यत्न

jikade pahe tikade bandhalonse hari | sutayacha kari bahu yatna

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
जिकडे पाहे तिकडे बांधलोंसे हरी । सुटायाचा करी बहु यत्न ॥१॥ परी तें वर्म मज न कळे कांहीं । अधिंकचि डोहीं बुडतसे ॥२॥ एका पुढें एक पडती आघात । सारितां न सरत काय करूं ॥३॥ चोखा म्हणे येथें न चलेंचि कांही । धांवे माझे आई विठाबाई ॥४॥