भजनी मालिका
← भजनांकडे परत

जिचें पीडे बाळ । प्राण तियेचा विकळ

jichen pide bal | pran tiyecha vikal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जिचें पीडे बाळ । प्राण तियेचा विकळ ॥१॥ ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ध्रु.॥ सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्तीं ॥२॥ तुका म्हणे संत । तुम्ही बहु कृपावंत ॥३॥