भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयजयकारें टाळी पिटिली सकळीं । चालली मंडली वैष्णवांची

jayajayakaren tali pitili sakalin | chalali mandali vaishnavanchi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जयजयकारें टाळी पिटिली सकळीं । चालली मंडली वैष्णवांची ॥१॥ पंढरीचा पोहा निघाला बाहेरी । कीर्तन गजरीं पुढें होत ॥२॥ विठोबा रखुमाई बैसलीं गरुडावर । केला नमस्कार विष्णवांनीं ॥३॥ म्हणती तीर्थयात्रा जाली यथासांग । पाहिले प्रसंग समाधीचे ॥४॥ गेले योगिराज अनादि जे आदि । राहिल्या समाधि जगामाजीं ॥५॥ नामा म्हणे देवा गेले मुनिजन । राहिलें तें ज्ञान जगामाजीं ॥६॥