भजनी मालिका
← भजनांकडे परत

जपजाप्य मंत्र नको यंत्र तंत्र । वर्णिजें जगत्र रामनाम

japajapya mantra nako yantra tantra | varnijen jagatra ramanam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जपजाप्य मंत्र नको यंत्र तंत्र । वर्णिजें जगत्र रामनाम ॥१॥ पाउला पाउली घडतसें यज्ञ । तेणें सर्व पुण्य हातीं जोडे ॥२॥ संतांची संगतीं नामाचा निजध्यास तेणें । जोडे सौरस हातीं मग ॥३॥ होई सावधान म्हणे जनार्दन । एकनाथ पूर्ण होईल धन्य ॥४॥