भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयदेव जयदेव जय विश्वंभरा । दर्शन व्यापक तुजविण नाही दुसरा

jayadev jayadev jay vishvambhara | darshan vyapak tujavin nahi dusara

रचनाकार: संत बोधले · अभंग
जयदेव जयदेव जय विश्वंभरा । दर्शन व्यापक तुजविण नाही दुसरा । तारक मारक हरि तू भक्तांचा सोयरा । आरती ओवाळू तुज परात्परा ॥१॥ विश्व व्यापक तो हा विश्वाचे ठायी । प्रकृतीवेगळा अससी विदेही । देहीचा चालक तू खेळविता पाही । तुजवाचुनी आणिक कोणीही नाही ॥२॥ नावरुप तुज याती नाकुळ । ब्रह्मांडनायक तू व्यापक सकळ । कीडा कीटक मुंगी सर्वांचे मूळ । अभक्तासी काय भक्त गोपाळ ॥३॥ साधु संत जन ज ध्याती सकळ । जया जैसा भाव त्या तैसा गोपाळ । जाणिव कृपाळू संचिताचे मूळ । संचितावेगळे कैचे ते फळ ॥४॥ माता पिता बंधु तूची सकळ । कन्यापुत्र अखंड तूची केवळ । भक्त भाविक जन तुज ध्यानी सकळ । इतरांसी न कळे बा भ्रांतीचे मुळ ॥५॥ बोधला म्हणे शरण मी आता । अखंड निजाध्यास हरिगुण गाता। हृदयी प्रकाश तुझा समयी । तुज वाचोनी आण नेणे सर्वथा ॥६॥