भजनी मालिका
← भजनांकडे परत

जयां आहे मुक्ति चाड । तयांसी गोड पंढरी

jayan ahe mukti chad | tayansi god pandhari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जयां आहे मुक्ति चाड । तयांसी गोड पंढरी ॥१॥ देव तीर्थ क्षेत्र संत । चहूंचा होत मेळा जेथ ॥२॥ कृष्णरामादि नामगजर । करिती उच्चार अट्टाहास्ये ॥३॥ स्त्रियाआदि नर बाळें । कौतुक लीळे नाचती ॥४॥ एका जनार्दनीं तयांसंगीं । विठ्ठलरंगी नाचतुसे ॥५॥