भजनी मालिका

भजने

चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥१॥ प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

चित्तीं माझें पांडुरंग । बैसला अभंग न ढळेसा ॥१॥ जातां दिवस जातां राती । स्वप्नीं जागृतीं सुषुप्तीं तो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चित्रगुप्त म्हणती करावें काई । यमदूताविण न चले कांहीं ॥१॥ नामें नागविलें नामें नागविलें । यम म्हणे माझे सामर्थ्य न चले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिदंबर क्षेत्री मल्हार दीक्षीत जाती तपस्यास सहीत सती ।।१।। मल्हार दीक्षीत भक्तीसामर्थ्याने सगुण केले जाणा विठ्ठलासी ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

चिदानंद चिद्रूप चित्त चिन्मय । बाळ यशोदेचें आनंद अद्वय ॥१॥ सत्य अभिनव सुख याच्या दर्शनीं । मिठी पडली पाहतां रूप नययीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चिदानंद दोंदिल बाळ डोळस । कृष्ण खेळवीत निवे मानस ॥१॥ सये आन कांहीं या जीवा नावडे । चित्त गुंतलें तया सुखी न निवडे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चिदानंद दोंदिल बाळ सांवळें । कृष्ण पाहतां नयनीं मन मावळे ॥१॥ तें सुख कवणें वाचें बोलिजे । चित्त चैतन्य समरसें भोगीजे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चिदानंद रुप चेतवितें एक । एकपणें गुणागुणीं दावी अनेक ॥१॥ आदि अंतीं गुण सर्वत्र निर्गुण । गुणासी अगुण भासतीना ॥ध्रु०॥

चिदानंदघन चिन्मय बाळकृष्ण । खेळवितां मन होय उन्मन ॥१॥ सुख अनुभवी अनुवाद खुंटला । विश्वंभरीं तोचि अनुवाद गोठला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चिमणाचि देखिला परि हा वाड झाला । गगनहि फांकला प्रकाश वरी ॥१॥ भरोनियां दाही दिशा कोंदाटला । पाताळा वरिही गेला पदांकु याचा ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । ग हवार बोभाट जनामध्यें ॥१॥ लटके चि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

चिरें आणूनियां वेंष्टलें । गोवळ अवघेचि शृंगारले । येरेयेरां म्हणती भले । गौरव घ्या रे मामाचा ॥१॥ चिरें गुंडिती माजेसी । उंच पटके ते पायासी । झगे वेष्टूनियां शिरासी । विजारा टाकिती खांदयावरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चुकलिया आम्हां करितसां दंड । हाकासी कां खंड पांडुरंगा ॥१॥ चाळविलीं एकें रिद्धीसिद्धीवरी । तैसा मी भिकारी नव्हें देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम