भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिदानंद दोंदिल बाळ डोळस । कृष्ण खेळवीत निवे मानस

chidanand dondil bal dolas | krushna khelavit nive manas

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चिदानंद दोंदिल बाळ डोळस । कृष्ण खेळवीत निवे मानस ॥१॥ सये आन कांहीं या जीवा नावडे । चित्त गुंतलें तया सुखी न निवडे ॥२॥ देहा गेहा आठव नाहीं सर्वथा । स्थिति बाणली सहज रूप पाहतां ॥३॥ तेज सांवळें द्दष्टींत कोंदलें । तेणें प्रकाशें सबाह्य मन माझें वेधलें ॥४॥ वृत्तिसहित इंद्रियें परतलीं । कृष्णरूपीं मिळोनियां गेलीं ॥५॥ नामया स्वामी आदि परंपरा । आवडता आहे तो माझा सोयरा ॥६॥