भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिन्हें उमटती अंगीं । शकुना जोगीं उत्तम

chinhen umatati angin | shakuna jogin uttam

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चिन्हें उमटती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥१॥ आठवला बापमाय । येईल काय मूळ नेणों ॥ध्रु.॥ उत्कंठित झालें मन । ते चि खुण तेथींचि ॥२॥ तुका म्हणे काम वारीं । आळस घरीं करमेना ॥३॥