भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्रगुप्त म्हणती करावें काई । यमदूताविण न चले कांहीं

chitragupta mhanati karaven kai | yamadutavin na chale kanhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
चित्रगुप्त म्हणती करावें काई । यमदूताविण न चले कांहीं ॥१॥ नामें नागविलें नामें नागविलें । यम म्हणे माझे सामर्थ्य न चले ॥२॥ यम चित्रगुप्त नाम विवंचीत । नम विवंचितां जाले मुक्त ॥३॥ यमें यमदुता आल्हादें भेटी । अवघे चतुर्भुज झाले वैकुंठीं ॥४॥ जनामाजी थोर दाटुगें नाम । यमें यमदूत झाले आत्माराम ॥५॥ एका जनार्दनीं नामाचा गुण । यमेसी यमलोक जाला परब्रह्मा पूर्ण ॥६॥