भजनी मालिका
← भजनांकडे परत

चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण

chittin baisalen chintan | narayan narayan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥१॥ न लगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥ध्रु.॥ हरपला द्वैतभाव । तेणें देह जाला वाव ॥२॥ तुका म्हणे आम्ही । जालों निष्काम ये कामीं ॥३॥