भजनी मालिका

भजने

गोक्षीर लाविलें अंधळिया मुखीं । तेथील पारखी जिव्हा जाणे ॥१॥ तैसे देवा तुझें नाम निरंतर । जिव्हेसी पाझर अमृताचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोजिरें श्रीमुख चांगलें । ध्यानीं मिरवले योगीयांच्या ॥१॥ पंढरी भुवैकुंठ भिवरेच्या तीरीं । वैकुंठाचा हरी उभा विटे ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें । म्हणतां पाप गेलें । विठ्ठलसें वाचेसी ॥१॥ सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । महापातकी चांडाळ । नामासाठी आपुलिया ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गोड तुझी ब्रीदावळी । गोड गातां नित्यकाळीं । गोड भक्त भावें बळी । तूं वनमाळी त्यापाशीं ॥१॥ गोड तुमचीं नामें गाती । गोड कीर्तनीं उभे ठाकती । गोडा गोड तूं श्रीपती । त्याची भुक्ति मुक्ति तूंचि तूं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गोड माझी वाणी तुम्हीं करुनि श्रीहरी । लावावी वैखरी कीर्तनस्तवनीं आपुलिये ॥१॥ इतुलेंनिचि सार्थक माझया होईल जन्माचें । अभयदान तुमचें ऐसें झालियावरी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥१॥ वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मीमाजी अंगें हारपलीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

गोडा गोड तुमचें नाम । गोड जन्म स्मरणें त्या ॥१॥ गोड वाचा पढतां गीत । गोड चित्त चिंतवें गोड ध्यानें तुमच्या मन । गोड स्तवने गुण वाणी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

गोणाई म्हणे नाम्या जल्पसी भलतें । तुज कोण्या दैवतें वोढियेलें ॥१॥ लाजिरवाणें तुवां केलें रे हें जिणें । हांसती पिसुनें देशोदशीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोणाई म्हणे नाम्या जल्पसी भलतें । तुज कोण्या दैवतें वोढियेलें ।। १ ।। लाजिरवाणें तुवां केलें रे हैं जिणें । हांसती पिसुनें देशोदशीं । । २ ।।

रचनाकार: संत गोणाई

गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरीं । तेंहुनि मी करीं आस तुझी ||१|| उपजलासि तैं मज जाला संतोष आनंद उल्हास वाटे जीवां ||२||

रचनाकार: संत गोणाई

गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरीं । तैहुनि मी करीं आस तुझी ॥१॥ उपजलासि तैं मज जाला संतोष । आनंद उल्हास वाटे जीवां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

गोणाई म्हणे नाम्या वचन माझें ऐक । पोटींचें बाळक म्हणोनि सांगे ॥१॥ महिमेचा संसार सांडोनि आपुला । संग त्वां धरिला निःसंगाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव