भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरीं । तेंहुनि मी करीं आस तुझी

gonai mhane namya rahilasi udarin | tenhuni mi karin as tujhi

रचनाकार: संत गोणाई · अभंग
गोणाई म्हणे नाम्या राहिलासी उदरीं । तेंहुनि मी करीं आस तुझी ||१|| उपजलासि तैं मज जाला संतोष आनंद उल्हास वाटे जीवां ||२|| गणगोतामजी के बारे नांव पंढरीचा देव प्रसन्न केला ||३।। रात्रंदिवस लेखी अंघोळीवरी तूं मज संसारी होसी म्हणोनि ।। ४ ।। तंब तुम अवचित उपजली बुद्धी भोपळा हा खांदी आवडला ॥५॥ हातीं टाळ घेऊनी करिसी आळवणी घागरिया चरणीं बांधोनियां ॥ ६ ॥ सांडोनि घर-दार आपुला संसार नाचतां विचार न धरिसी ||७|| नव्हें तें करितां कोण असे वारिता। परी त्वां आपल्या हिता प्रवर्तावें ॥८॥ मी एक आहे तंव करीन तळमळ मग तुझा सांभाळ करील कोण॥९॥ यानी नाहीं संसार हा बोल निर्धार सत्य माझा ।।१०।। कोण्या गुर्गे तुवां घेतलें धर गोणाई म्हणे करणे फळा आलें ||११||