भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ

godipanen jaisa gul | taisa dev jala sakal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥१॥ आतां भजों कवणे परी । देव सबाह्य अंतरीं ॥ध्रु.॥ उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ॥२॥ हेम अळंकारा नामीं । तुका म्हणे तैसे आम्ही ॥३॥