भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी चिंताक्रांत मनीं दुःख धरिलें । म्हणे कां बायें दिधलें ऐशियासी

aisi chintakrant manin duhkh dharilen | mhane kan bayen didhalen aishiyasi

रचनाकार: संत राजाई · अभंग
ऐसी चिंताक्रांत मनीं दुःख धरिलें । म्हणे कां बायें दिधलें ऐशियासी ।।१।। खाया ना जेवाया लेया ना नेसाया। दैन्य भोगावया आलें जन्मा ||२|| जयाचि करीं भक्ति त्याचेंचि करणें घरोघरी हिंडणें न चुके माझें ।।३।। लाज सांडुनियां निलाजरा जाला सूड पडसूड मारिला जोग ज्याणें ||४|| देवासुरीं वाहिली तेचि देना आली उचित राहिली तेहनि ||५|| ऐसी भक्तकांता मनी वा चिंता काय जाला करिता पंढरिराय॥ ६ ॥ वेष वाणियाचा सर्वे बैल द्वयाचा म्हणे नामा आमुचा केउतां गेला ॥७॥ बिद उमा राहिला घर पुसों लागला म्हणे नामा राहिला कोणें ठायीं ॥८॥ सांगितलें बिराड तुळसीवन अपार । तेंचि जाणा घर नामयाचें ॥९॥ बाहेर तरी कोणी बैसलासे द्वारीं । बोलविली नारी नामयाची ||१०|| अहो घ्याहो बाई हे ठेवावी गोणी नामा येतो परतोनी येईन मी ।।११।। येरी म्हणे तुम्ही त्याचें काय जाणा । आपुली नाम खुणा सांगा तुम्ही ।।१२।। नाम पुसेल तरी केशवशेटी सांगावें लागेल तितुकें बेचायें हैं द्रव्य ।।१३।। आणिक मज मागावें कांहीं न ठेवावें । माझें क्षेम सांगावें सखा म्हणोनि ।।१४।। इतुकें बोलुनि देव पाठमोरा जाला। सवेंचि घरा आला विष्णुदास ।। १५ ।। म्हणे कैंची गोणी टाकुन गेला वाणी । परि आम्ही कोणी ओळखूं ना।। १६ ।। त्यानें नांव केशवशेटी म्हणितलें। तंव धेरें जाणिलें माझा देव ।।१७।। कां गे धांवा केला देव माझा कष्टला। अपराध जाला तुजपाशीं ।।१८।। राजाई म्हणे आम्हां थोर लाभ जाला। बिडवई भेटला केशवी ।।१९।।