भजनी मालिका
← भजनांकडे परत

ऐसी चाल नाहीं कोठें । नमस्कारा आधीं भेटे

aisi chal nahin kothen | namaskara adhin bhete

रचनाकार: संत नामदेव · अभंग
ऐसी चाल नाहीं कोठें । नमस्कारा आधीं भेटे ॥१॥ मायबापा निर्विकारीं । सखा नांदतो पंढरीं ॥२॥ देव भक्तपण । नाहीं नाहीं त्यासी आण ॥३॥ नामा म्हणे आधीं भेटी । मग चरणां घालीन मिठी ॥४॥