भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक धांवुनी सांगिती । अहो नंदराया म्हणती । पुत्रसुख प्राप्ति । मुख पहा चला

ek dhanvuni sangiti | aho nandaraya mhanati | putrasukh prapti | mukh paha chala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक धांवुनी सांगिती । अहो नंदराया म्हणती । पुत्रसुख प्राप्ति । मुख पहा चला ॥१॥ सर्वें घेऊनि ब्राह्माण । पहावया पुत्रवदन । धावूंनियां सर्वजण । पहावया येती ॥२॥ बाळ सुंदर राजीवनयन । सुहास्यवदन घनः श्यामवर्ण । पाहूनियां धालें मन । सकळिकांचे तटस्थ ॥३॥ पाहूनि परब्रह्मा सांवळा । वेधलें मान तमालनीळा । एका जनार्दनी पाहतां डोळा । वेधें वेधिलें सकळ ॥४॥