भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक पांच तीन नावांचे शेवटीं । अठरा हिंपुटीं जयासाठी

ek panch tin navanche shevatin | athara himputin jayasathi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक पांच तीन नावांचे शेवटीं । अठरा हिंपुटीं जयासाठी ॥१॥ सात तेरा चौदा घोकितां श्रमले । पंचवीस शिणले परोपरी ॥२॥ तेहतिसां आटणी चाळिसां दाटणीं । एकुणपन्नसांची कहाणी काय तेथें ॥३॥ एकाजनार्दनीं एकपणें एक । बावन्नाचा तर्क न चालेचि ॥४॥