भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक ना दुसरें वो नव्हते मजपांशी । मी मज नोळखतां आप आपणासी । होति ये निर्जनी वो निराभास देसीं । नेणों कोणें आणियेलें कर्मभूमिसी

ek na dusaren vo navhate majapanshi | mi maj nolakhatan ap apanasi | hoti ye nirjani vo nirabhas desin | nenon konen aniyelen karmabhumisi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
एक ना दुसरें वो नव्हते मजपांशी । मी मज नोळखतां आप आपणासी । होति ये निर्जनी वो निराभास देसीं । नेणों कोणें आणियेलें कर्मभूमिसी ॥१॥ तैंसपासूनियां विसरलें निजसुखा । वाटे जीव माझाचि परि मज वो पारिखा । देखोनि आपपर पात्र जालें बहु दु:खा । सांगो कोणापासि सये जाला ऐसा वाखा वो ॥२॥ मी मज माझियानि वेढाळिलें बाई । चित्तासि या चिंतने वो घातलें प्रवाही । नेणेंचि विश्रांति कोठे विचरतां मही । जेथूनियां आलिये ते नाठवेचि कांही वो ॥३॥ नसतेंचि काम क्रोध लागले हे वैरी । येऊनियां आशा चिंता बैसल्या जिव्हारी । व्दैषनिंदेचिया नित्य नाना भरोवरी । कामना कल्पना ह्या दाटल्या शरीरीं वो ॥४॥ किती तरी करुं या संसारा पुरवणी । किती सोसू येऊं जाऊं यमाची जाचणी । किती येऊं जाऊं भोगूं नाना यातिचिया खाणी । किती गर्भवासी बैसों थर अडचणि वो ॥५॥ ऐसि जाजावलि बहु अनुतापें बाळा । घेऊनियां विकृतियां विषयाचा कंटाळा । मनोभावें चिंतिला बा श्रीरंग सांवळा । पावली निजस्थान पुनरपि म्हणे निळा वो ॥६॥