भजनी मालिका

भजने

इतुकें देखोनि चरणीं घाली मिठी । सांठवला सृष्टी अवघाअ देव ॥१॥ तिहीं त्रिभुवनीं आपण व्यापुनी । आनंदें कोंडोनि राहियेला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

इतुकेंचि देई रामनान मुखीं । संतांची संगती सेवा सार ॥१॥ निरंतर घोष जयाचे मंदिरीं । तयाचिये घरी सुखे मज ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥१॥ इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥१॥ न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

इंद्र चंद्र महेंद्र सर्व । मानवती देव हरिभक्तां ॥१॥ म्हणती इहींचि केला ऋणी । चक्रपाणी कीर्तनें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

इंद्र म्हणे गा देवदेवा । न कळती आम्हां तुझिया मावा । कळसूत्रीं तें विश्रवलाघवा । करिसी घडामोडी स्वर्गाच्या ॥१॥ निर्मिला तुवां चतुरानन । आपुलिये नाभीं देऊनि स्थान । तुझिया सत्ता माही गगन । पंचमहाभूतें वाढलीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

इंद्राचा विभाग भक्षी चक्रपाणी । रूप गोवर्धना धरू-नियां ॥१॥ क्रोधावला इंद्र गौळिया निंदीत । दावीन सामर्थ्य तुम्हां आतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

इंद्राचे कैवारें कांसव पै झाला । देव घुसळिती पृष्ठीं भार वाहिला ॥१॥ तो पहा महाराज विटे उभा नीट । भक्त तारावया केली पंढरी पेठ ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इंद्रिया देवाची सुटली बांदवडी । स्वानंदें उभाविली गुढी सरली असुर धाडी ॥१॥ रामराज्य झालें रामराज्य झालें । रामराज्य झालें सदगुरुचेनि बोले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

इंद्रियांची पुरली धांव । मनासी ठाव विश्रांति ॥१॥ तया नांव ब्रम्हप्राप्ती । जेथे उपरति चित्ताचीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा