भजनी मालिका
← भजनांकडे परत

इंद्रादिकां देवां । पदीं स्थापुनी वाटी सेवा

indradikan devan | padin sthapuni vati seva

रचनाकार: संत निळोबा · अभंग
इंद्रादिकां देवां । पदीं स्थापुनी वाटी सेवा ॥१॥ तो हा येऊनि पंढरीयें । इटेवरीं उभा ठाये ॥२॥ चिंतिती चतुरानन । ईश्वराचें ध्येय जो ध्यान ॥३॥ निळा म्हणे ज्यातें गीती । सदा वेदश्रुती गाती ॥४॥