भजनी मालिका
← भजनांकडे परत

इंद्रियांचीं दिनें । आम्ही केलों नारायणें

indriyanchin dinen | amhi kelon narayanen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
इंद्रियांचीं दिनें । आम्ही केलों नारायणें ॥१॥ म्हणऊनि ऐसें सोसीं । काय सांगों कोणांपाशी ॥ध्रु.॥ नाहीं अंगीं बळ । त्याग करींजेसा सकळ ॥२॥ तुका म्हणे मोटें । प्रारब्ध होतें खोटें ॥३॥