भजनी मालिका
← भजनांकडे परत

इतुकियासाठीं । बहु तुष्टला धुर्जटी

itukiyasathin | bahu tushtala dhurjati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
इतुकियासाठीं । बहु तुष्टला धुर्जटी ॥१॥ काय सांगावा विचार । दैव पारध्याचें थोर ॥२॥ झाली तीन प्रहर निशी । पूजा पावली देवासी ॥३॥ धाडियेलें यमाला । सुखी कराया तयाला ॥४॥ आला तो धांवत । माग ह्मणे अपेक्षीत ॥५॥ त्याची विषयक भक्ति । पुढती झाली तया गती ॥६॥ जें जें याचकें मागावें । तें तें दातयानें द्यावें ॥७॥ काय मागितलें तेणें । तेंचि नामा ऐका म्हणे ॥८॥