भजनी मालिका
← भजनांकडे परत

इतर साधनीं उपाव । करिती ते ते आम्हां देव

itar sadhanin upav | kariti te te amhan dev

रचनाकार: संत निळोबा · अभंग
इतर साधनीं उपाव । करिती ते ते आम्हां देव ॥१॥ काय जाणितलें तिहीं । पडिले साधनांचे वाहीं ॥२॥ कोण लाभ कैसी गती । काय पावती ते अंतीं ॥३॥ निळा म्हणे नेणों आम्ही । तुमच्या नामेंविण स्वामी ॥४॥