आम्हीं शरणागतीं केलासी सरता । येर्हवीं अनंता कोण जाणे
amhin sharanagatin kelasi sarata | yerhavin ananta kon jane
आम्हीं शरणागतीं केलासी सरता । येर्हवीं अनंता कोण जाणे ॥१॥ वेदशास्त्र पुराणीं उबगोनि सांडिलासी । तो तूं आम्हीं धरिलासे ह्रदयकमळीं ॥२॥
amhin sharanagatin kelasi sarata | yerhavin ananta kon jane
आम्हीं शरणागतीं केलासी सरता । येर्हवीं अनंता कोण जाणे ॥१॥ वेदशास्त्र पुराणीं उबगोनि सांडिलासी । तो तूं आम्हीं धरिलासे ह्रदयकमळीं ॥२॥
amhin sharanagatin sandili vasana | te tvan narayana angikarili
आम्हीं शरणागतीं सांडिली वासना । ते त्वां नारायणा अंगिकारिली ॥१॥ म्हणोनि प्रसन्न व्हावया आमुतें । वोसारल्या चित्तें चालविसी ॥२॥
amhi sadaiv sudake | javalin yetan chor dhake | jaun pudi bhiken | kutarin ghar rakhati
आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके । जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥१॥ नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा । थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥
amhin sannyas ghetala
आम्हीं संन्यास घेतला । देहादिकांचा त्याग केला ॥१॥
amhi sarvakal kainchin savadhan | vyavasayen man abhyasalen
आम्ही सर्वकाळ कैंचीं सावधान । व्यवसायें मन अभ्यासलें ॥१॥ तरी म्हणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥
amhi svarga lok manun jaisa ok | dekhoniyan sukh vaikunthinchen
आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक । देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥ नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस विठोपाय़ीं ॥२॥
amhi svarga lok manun jaisa ok dekhoniyan sukh vaikunthinchen
आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥ नलगे बैकुंठ न वांछू कैलास । सर्वस्वाची आस विठोपायीं ॥२॥
amhin svargasukh manun jaisa ok | dekhoniyan sukh pandharichen
आम्हीं स्वर्गसुख मानूं जैसा ओक । देखोनियां सुख पंढरीचें ॥१॥ नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस देवा पायीं ॥२॥
amhi svamichiya balen | yethen ason khelemelen
आम्ही स्वामीचिया बळें । येथें असों खेळेमेळें ॥१॥ नामें गाऊनी आवडी । करुं पदांच्या घडामोडी ॥२॥
amhi hariche savangade june thayinche vede bagade | hatin dharuni kade pathisaven vagavilon
आम्ही हरीचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरुनी कडे पाठीसवें वागविलों ॥१॥ म्हणोनि भिन्न भेद नाहीं ।देवा आम्हां एकदेहीं । नाहीं जालों कहीं। एका एक वेगळे ॥ध्रु.॥
amhi hata jaun lavakari yeun | naivedya pathavun namya hatin
आम्ही हाटा जाऊं लवकरी येऊं । नैवेद्य पाठवूं नाम्या हातीं ॥१॥ दुसर्या दिवशीं नैवेद्य धाडिला । दामसेठी गेला त्याच्या मागें ॥२॥
amhin hoton pandharisi | amachi junat mirasi
आम्हीं होतों पंढरिसी । आमची जुनाट मिरासी ॥१॥ राई रखुमाई माता । पांडुरंग आमुचा पिता ॥२॥
ayushya gelen vanyanvin | thor jhali nagavan
आयुष्य गेलें वांयांविण । थोर झाली नागवण ॥१॥ आतां धांवें धांवें तरी । काय पाहातोसि हरी ॥ध्रु.॥
ayushya jaten pal pal tujala kaisen kalena | do divasachi tanu he sachi alasi re pahuna
आयुष्य जातें पळ पळ तुजला कैसें कळेना । दो दिवसाची तनु हे साची आलासी रे पाहुणा ॥१॥ चौसष्ट घडीयामाजीं रात्र गेलीं समजेना । आयुष्य खातो काळ तुम्हीं राम कां रे म्हणाना ॥२॥
ayushya jaten maguten yeten | ramanamen saraten hoy mukh
आयुष्य जातें मागुतें येतें । रामनामें सरतें होय मुख ॥१॥ देह जातें मागुतें होतें । रामनामें सरतें होय मुख ॥२॥
ayushya jay majhe vyartha | datta samartha maharaj
आयुष्य जाय माझे व्यर्थ । दत्त समर्थ महाराज ॥१॥ धांव धांव लवकरी । करुणा करी गुरूराया ॥२॥
ayushya ten tin bhag jahalen | pari mukhin ram na bole
आयुष्य तें तीन भाग जाहलें । परी मुखीं राम न बोले ॥१॥ सदा प्रपंचासी मन । वरवर ब्रह्माज्ञान ॥२॥
ayushya dehinchen janv puralen nahin | tanvachi hrudayin ram japa
आयुष्य देहींचें जंव पुरलें नाहीं । तंवचि हृदयीं राम जपा ॥१॥ आपुलेच देहीं करा सोडवण । चुकवा पतन यमलोकीं ॥२॥
ayushya bhavishya hen tanv kavana hatin | vayanchi vahati kunthakunthi
आयुष्य भविष्य हें तंव कवणा हातीं । वायांची वाहती कुंथाकुंथी ॥१॥ आयुष्याचा अंत आलिया जवळी । कोण तया वेळीं सांभळीत ॥२॥
ayushya mojavaya baisala mapari | tun kan re vevhari sansaracha
आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारी संसाराचा ॥१॥ नेईल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुश्चिता हरीविण ॥ध्रु.॥