भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं स्वर्गसुख मानूं जैसा ओक । देखोनियां सुख पंढरीचें

amhin svargasukh manun jaisa ok | dekhoniyan sukh pandharichen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
आम्हीं स्वर्गसुख मानूं जैसा ओक । देखोनियां सुख पंढरीचें ॥१॥ नलगे वैकुंठ न वांछूं कैलास । सर्वस्वाची आस देवा पायीं ॥२॥ नलगे संतति आणि धन मान । एक असे ध्यान विठो-वाचें ॥३॥ सत्य कीं मायिक आमुचें बोलणें । तुझी तुज आण सांग हरि ॥४॥ जीवभाव आम्ही सांडूं ओंवाळुनी । नामा लोटांगणीं महाद्वारीं ॥५॥