भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक देखोनियां सुख वैकुंठींचें

amhi svarga lok manun jaisa ok dekhoniyan sukh vaikunthinchen

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
आम्ही स्वर्ग लोक मानूं जैसा ओक देखोनियां सुख वैकुंठींचें ॥१॥ नलगे बैकुंठ न वांछू कैलास । सर्वस्वाची आस विठोपायीं ॥२॥ नलगे संतति धन आणि मान। एक करणें ध्यान विठोबाचें ॥३॥ सत्य कीं मायीक आमुचे बोलणें तुमची तुम्हां आण सांगा ही ||४|| जीवभाव आम्ही सांई वाळूनि म्हणे दासी जनी नामयाची ॥५॥