भजनी मालिका
← भजनांकडे परत

आयुष्य देहींचें जंव पुरलें नाहीं । तंवचि हृदयीं राम जपा

ayushya dehinchen janv puralen nahin | tanvachi hrudayin ram japa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आयुष्य देहींचें जंव पुरलें नाहीं । तंवचि हृदयीं राम जपा ॥१॥ आपुलेच देहीं करा सोडवण । चुकवा पतन यमलोकीं ॥२॥ संसाराचा छंद वाउगा पसारा । यांत सैरावैरा हिंडुं नका ॥३॥ एका जनार्दनीं धरा भरंवसा । श्रीराम सरसा वाचे वदा ॥४॥