भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं संन्यास घेतला

amhin sannyas ghetala

आम्हीं संन्यास घेतला । देहादिकांचा त्याग केला ॥१॥ आम्ही संन्यासी संन्यासी । सदा राहों एकांतेंसी ॥२॥ चित्तचतुष्टया निरसिलें । अज्ञाना तिळोदक दिधलें ॥३॥ ज्ञानाचें विज्ञान आलें हातां ॥ आम्हां नाहीं शरीरममता ॥४॥ ब्रह्माहमस्मि शुध्दज्ञान । तेथील सांडिला अभिमान ॥५॥ बापरखुमादेविवरु विठ्ठ्लु ह्रदयीं । तोचि सबाह्यअभ्यंतर ठाई असे रया ॥६॥