भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके । जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती

amhi sadaiv sudake | javalin yetan chor dhake | jaun pudi bhiken | kutarin ghar rakhati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके । जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥१॥ नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा । थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥ अक्षय साचार । केलें सायासांनी घर । एरंडसिंवार । दुजा भार न साहती ॥२॥ धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी । जतन तीं करी । कोण गुरें वासरें ॥३॥ जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती । झुळझुळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥४॥ तुका म्हणे देवा । अवघा निरविला हेवा । कुटुंबाची सेवा । तोचि करी आमुच्या ॥५॥