भजनी मालिका

भजने

आम्हीं भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा पुढावा । पतना न्यावा दशरथ ॥१॥ तरी म्या काय गा करावे । कोण्या रीती तुज पावावे । न सांगतां ठावे । तुम्हां विण न पडे॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही भाविकें हे काय जाणों खोडी । आइकोनि प्रौढी विनविलें ॥१॥ नाहीं ऐसें येथें झालेती असतां । वाढविली चिंता अधिक सोस ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरीं तूं भीतोसि पांडुरंगा ॥१॥ पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आम्ही धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्हीं मुक्त म्हणोनि विचरती महीं । मुक्त ही पदवी नाहीं अंगी ॥१॥ सैर धांवे मन नाहीं पैं अटक । मुक्तज्ञान मौक्तिक वायां जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

आम्ही मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची मी ॥१॥ सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही म्हणों कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥१॥ हागे माझ्या भोगें केलासी परता । विश्वंभरीं सत्ता नाहीं ऐसी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही लेंकुरें लळेवाडें । तुमचीं तैसीं त्याहि पुढें । क्रीडा करुनी वाडे कोडें । येऊं भेटोनियां वोरसें ॥१॥ नाहीं तया पोटीं मैल । अत्यादरें धाडिलें असे मूळ । अक्रूर सांगताहे केवळ । भेटी आमुची इच्छितो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

आम्ही विठ्ठलाचे दास झालों आतां । न चलेचि सत्ता आणिकांची ॥१॥ नावरे तयासी ऐसें नाहीं दुजें । करितां पंढरिराजें काय नव्हे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही वीर झुंझार । करूं जमदाढे मार । थापटिले भार । मोड जाला दोषांचा ॥१॥ जाला हाहाकार । आले हांकीत झुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठीं हार तुळसीचे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताया ॥१॥ झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही शक्तीहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥१॥ माझें मज देई देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

आम्ही शरणागत परि सर्वस्वें उदार । भक्तीचे सागर सत्वशील ॥१॥ काय वाचा मनें अर्थ संपत्ति धन । दिधलें तुजलागुन पांडुरंगा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव