भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही भाविकें हे काय जाणों खोडी । आइकोनि प्रौढी विनविलें

amhi bhaviken he kay janon khodi | aikoni praudhi vinavilen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही भाविकें हे काय जाणों खोडी । आइकोनि प्रौढी विनविलें ॥१॥ नाहीं ऐसें येथें झालेती असतां । वाढविली चिंता अधिक सोस ॥ध्रु.॥ न कळे चि आधीं करितां विचार । न धरितां धीर आहाचता ॥२॥ तुका म्हणे आतां वचनें वचन । वाढले तीक्ष्ण बुद्धी झाली ॥३॥