भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताया

amhi vaikunthavasi | alon ya chi karanasi | bolile je rushi | sach bhaven vartaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताया ॥१॥ झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उच्छिष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥ अर्थे लोपलीं पुराणें । नाश केला शब्दज्ञानें । विषयलोभी मन । साधनें बुडविलीं ॥२॥ पिटूं भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा । तुका म्हणे करा । जय जयकार आनंदें ॥३॥