भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्ही मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची मी

amhi melon tevhan deh dila deva | atan karun seva konachi mi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्ही मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची मी ॥१॥ सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें ॥ध्रु.॥ बोलतसें जैसें बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥२॥ पाप पुण्य ज्याचें तोचि जाणें कांहीं । संबंध हा नाहीं आम्हांसवें ॥३॥ तुका म्हणे तुम्ही आइका हो मात । आम्ही या अतीत देहाहूनी ॥४॥