भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं योग साधियेला । भांग भुरका तो आणला

amhin yog sadhiyela | bhang bhuraka to anala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हीं योग साधियेला । भांग भुरका तो आणला ॥१॥ योग कळे तयां मूढा । साधन काय तें दगडा ॥२॥ आंत काळा बाहेर काळा । माप नाहीं अमंगळा ॥३॥ एका जनार्दनीं ते पामर । साधन साधिती ते खर ॥४॥