भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हीं मुक्त म्हणोनि विचरती महीं । मुक्त ही पदवी नाहीं अंगी

amhin mukta mhanoni vicharati mahin | mukta hi padavi nahin angi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हीं मुक्त म्हणोनि विचरती महीं । मुक्त ही पदवी नाहीं अंगी ॥१॥ सैर धांवे मन नाहीं पैं अटक । मुक्तज्ञान मौक्तिक वायां जाय ॥२॥ भूतमात्रीं द्रोही करिती नानापरी । वेदशास्त्र निर्धारी ठाउकें नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं कायसे ते मुक्त । जगीं जाणा फजींत नलाजरे ॥४॥