भजनी मालिका

भजने

राजारामासी दोघी कृष्णा राधा नामे होत्या हो कामीनी।।१।। चाकरीस जाती हंगाबादेसी शीलेदारी काम करीता जाण||२||

रचनाकार: संत विठाबाई

राजाला आळस संन्याशाला सायास । विधवेसी विलास विटंबना ॥१॥ व्याघ्रासी शांतता गाईसी उग्रता । वेश्येसी हरिकथा । विटंबना ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राजियाची कन्या नाम मिराबाई । विठोबाचे पायीं रत सदा ॥१॥ मायबाप तिचे करिती कृष्णसेवा । आवडीनें देवा पूजिताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

राजीवाक्ष प्रभु रुक्मिणीरण । मनोहर ध्यान श्रीकृष्णाचें ॥१॥ शंख चक्रगदा पीतांबरधारी । नमिला कंसारी प्रेमभावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

राज्यीं स्थापियेला उग्रसेन तेव्हां । देवकी वसुदेवा सोडविलें ॥१॥ देवकीच्या स्तनीं फुटलासे पान्हा । वसुदेव द-र्शना करीतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रात्रंदिवस खंती वाटे माझे जीवीं । अनुदिनीं आठवीं चरण तुझे ॥१॥ ने रे पांडुरंगा आपुलिया गांवा । तूं माझा विसावा जिवलग ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रात्रंदिवस जप होती साठ घटिका । संख्या त्याची ऐका निरनिराळी ॥१॥ दीड घटिका पळें दहा निमिष दोन । प्रथम तें स्थान आधारचक्र ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रात्रंदिवस भार वाहे खरा । बाइलेंचें उदर भरितसे ॥१॥ नेणे दानधर्म व्रत आचरण । अतिथी पूजन स्वप्नी नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रात्रदिवस मन रंजलें । हरिचरणीं चित्त जडलें । विरहाचें दुःख फिटलें । धन्य झालें संसारीं ॥१॥ विरह गेला सुख झालें वो माया । पुढतोपुढती आनंद न समाये ॥धृ॥

रचनाकार: संत एकनाथ

रात्रंदिवस मनीं करीतसे चिंता । काय हे अनंता कर्म माझें ॥१॥ माझीया अदृष्टीं नाही पुत्रसुख । नित्त्यानित्य दु:ख आम्हालागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रात्रीं जाग्रण नामस्मरण चित्तीं । घडली ते तिथी एकादशी ॥१॥ तियेचे हातीं विमानासी गती । चालावया पंथी वेळ नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

रात्री दिवस आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन ॥१॥ जीवा ही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य करी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

रात्री पळे येतांचि सविता । सिंहगर्जनें कुंजर चळता ॥१॥ तैसें हरिभक्तां सांकडें । येताचि पळे दृष्टीपुढें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

रात्रीची प्रौढी नोहे सुर्याचा प्रकाश । तोवंरींचे भास आंधाराचा ॥१॥ सुर्याचे उदयीं अंधार हा नासे । तैसें अज्ञानें नासे ज्ञान सर्व ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ