भजनी मालिका
← भजनांकडे परत

राधा आणि मुरारी । क्रीडा कुंजवनीं करीं

radha ani murari | krida kunjavanin karin

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
राधा आणि मुरारी । क्रीडा कुंजवनीं करीं ॥१॥ राधा डुल्लत डुल्लत । आली निजभुवनांत ॥२॥ सुमनाचे सेजेवरी । राधा आणि तो मुरारी ॥३॥ आवडीनें विडे देत । दासी जनी उभी तेथ ॥४॥