भजनी मालिका
← भजनांकडे परत

राज्यीं स्थापियेला उग्रसेन तेव्हां । देवकी वसुदेवा सोडविलें

rajyin sthapiyela ugrasen tevhan | devaki vasudeva sodavilen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
राज्यीं स्थापियेला उग्रसेन तेव्हां । देवकी वसुदेवा सोडविलें ॥१॥ देवकीच्या स्तनीं फुटलासे पान्हा । वसुदेव द-र्शना करीतसे ॥२॥ वासुदेवें केलें त्याचें समाधान । गायी दिल्या दान ब्राह्मणांसी ॥३॥ समस्तांचि क्रिया करी उग्रसेन । झा-लासे दिवाण देव त्याचा ॥४॥ पळोनियां गेले होते जे यादव । आणियेले सर्व रामकृष्णें ॥५॥ आनंद न माये सकळ लोकांला । मथुरेत राहिला नामा ह्मणे ॥६॥